Ameesha Patel Court Case : बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल मागील काही काळापासून चित्रपटांतून दूर असल्याने ती चर्चेत नसल्याचं दिसत आहे. पण आता एका नको असलेल्या कारणामुळे अमीषा चर्चेत आली आहे. अमिषाला यूटीएफ टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (UTF Telefilms Private Limited) चेक बाऊन्स प्रकरणात अडकावे लागले आहे. त्यामुळे भोपाळमधील जिल्हा न्यायालयाने अमिषाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे आमिषाला 4 डिसेंबरला न्यायालयात
 हजर देखील राहावे लागणार आहे.


यूटीएफ टेलिफिल्म्स प्रायव्हेट या कंपनीच्या म्हणण्यानुसार, अमीषा आणि तिची कंपनी अमीषा पटेल प्रोडक्शनने (Ameesha Patel Production) त्याच्या कंपनीकडून चित्रपट बनवण्यासाठी 32.25 लाख रुपये कर्ज घेतले होते. या कराराअंतर्गत तिने कंपनीला 32.25 लाख रुपयांच्या बदल्यात दोन चेक दिले होते, जे बाऊन्स झाले आहेत. यामुळे कंपनीने अमीषाविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. याआधीही अमीषाविरुद्ध इंदोरमध्ये 10 लाखांच्या चेक बाऊन्सप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


अमीषा पटेल आणि बॉलीवूड


2000 साली अभिनेता ह्रतिक रोषनसोबत कहो ना प्यार हे चित्रपटातून अमीषाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिलाच चित्रपट तुफान हिट झाल्यामुळे अमीषा रातोरात स्टार बनली. ज्यानंतर तिला पुढच्याच वर्षी सनी देवोलसोबत गदर-एक प्रेम कथा चित्रपटातून अमिषाने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप सोडत आपला स्टारडम आणखी उंचवला. त्यानंतर हमराज, भुलभुलैया अशा हीट चित्रपटातून तिने उत्कृष्ट परफॉरमन्स देत आपली जागा बॉलीवूडमध्ये मजबूत केली. पण त्यानंतर हळूहळू ती चित्रपटातून गायब होत गेली. ज्यामुळे आता बराच काळ ती कोणत्या चित्रपटात दिसलेली नाही.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha