पुणे : दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटावरुन आज पुण्यात चांगलाच गोंधळ घालण्यात आला. आपल्या इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं. मात्र काँग्रेसनं त्याला जोरदार विरोध केला.
पुण्यातील मधुर भांडारकरांची पहिली पत्रकार परिषद रद्द झाल्यानं भांडारकर बावधनमधील सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार होते. त्यामुळे मधुर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला.
अखेर भांडारकरांनी पुणे स्टेशनजवळील क्राउन प्लाझामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. मात्र त्याठिकाणीही माजी गृह राज्य मंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले आणि जोरदार विरोध केला. अखेर रमेश बागवेंसह काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इंदू सरकारचं पुण्यातील प्रमोशन काँग्रेसनं हाणून पाडलं
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
15 Jul 2017 06:02 PM (IST)
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटावरुन आज पुण्यात चांगलाच गोंधळ घालण्यात आला. आपल्या इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं. मात्र काँग्रेसनं त्याला जोरदार विरोध केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -