मुंबई : बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री म्हणजेच आलिया भट आणि श्रद्धा कपूर यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरु झालं आहे. आलिया आणि श्रद्धा कपूर दोघीही या चर्चा फेटाळत आहेत. मात्र, दोघींमध्येही जबरदस्त स्पर्धा सुरु झाल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे.

 

आलिया आणि श्रद्धा यांच्यामध्ये कायम पुढे जाण्याची स्पर्धा सुरु असते. एकीकडे आलिया एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत आहे, तर दुसरीकडे श्रद्धा कपूरचे अनेक सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाले आहेत.

 

उडता पंजाब सिनेमातील भूमिकेमुळे आलियाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. त्यामुळे श्रद्धा कपूर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

 

श्रद्धा कपूर सध्या आगळ्या-वेगळ्या भूमिकेच्या शोधात आहे. आलियाच्या उडता पंजाबमधील भूमिकेसारखी भूमिका श्रद्धाला मिळाल्यास दोघींमधील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे.