Salman Khan Ajay Devgn Film : रोहित शेट्टीने सिंघम अगेन चित्रपटात सलमान खानसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती, पण आता समोर आलेल्या बातमीने 'भाईजान'च्या चाहत्यांची निराशा होणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंघम अगेनमध्ये सलमान खानची झलक दाखवल्यापासून चाहते त्याकडे डोळे लावून बसले आहेत. आता चाहते चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघमला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण, आता रोहित शेट्टीने सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. या अपडेटमुळे 'दबंग' सलमान खानच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील नसणार 'चुलबुल पांडे'
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेन अलिकडेच रिलीज झाला, ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट म्हणून प्रेक्षक सलमान खान आणि अजय देवगण यांना एकत्र पाहण्याची आशा करत आहेत. पण, दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीने एका मुलाखतीत चुलबुल पांडे आणि सिंघमच्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. सिंघम अगेन चित्रपटात केलेल्या घोषणेमुळे चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, पण हा चित्रपट कॉप युनिव्हर्सचा भाग नसेल. सिंघम अगेन चित्रपटात मिशन सिंघम अगेन (Mission Chulbul Singham) चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
रोहित शेट्टीकडून सलमान खानच्या चाहत्यांची निराशा
सलमान खानसोबत मैत्री असूनही चित्रपट बनायला इतका वेळ का लागत आहे, या प्रश्नावर रोहित शेट्टीने उत्तर दिलं आहे. नुकतीच गलाटा इंडियाला एका मुलाखतील रोहितस शेट्टीने सलमान खान आणि अजय देवगणच्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. सलमान खानसोबतच्या चित्रपटाबदद्लच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शेट्टी म्हणाला की, "तुम्हाला योग्य चित्रपटाची गरज आहे. पुढे काय होणार याची तुमच्या योजना, विचार तुमच्या डोक्यात असायला हवा. सिंघम अगेन ही अनेक पात्रांची फक्त ओळख होती. त्या पात्रांचा प्रवास वेगळा असेल".
"हा चित्रपट कोणत्याही युनिव्हर्सचा भाग नसेल"
रोहित शेट्टी पुढे म्हणाला की, "सलमान खानसोबत चित्रपटाबाबत चर्चा नेहमीच होते. 5-6 वर्षांपासून आम्ही जेव्हा कधी भेटतो, तेव्हा हेच सुरु असतं की, चुलबुल आणि सिंघम एकत्र यायला हवेत. चुलबुल आणि सिंघम एकत्र येणार हे आश्चर्यकारक असेल असंही मला वाटलं. पण हो, मग हा एक स्वतंत्र चित्रपट असेल. हा चित्रपट कोणत्याही युनिव्हर्सचा भाग नसेल". हा एक स्वतंत्र चित्रपट असावा, अशी रोहित शेट्टीची इच्छा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :