Archana Puran Singh Faces Health Crisis: 90 दशकातील अभिनेत्री सध्या 'द कपिल शर्मा' शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या अर्चना पुरण सिंह सध्या एका कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  अर्चना पुरण सिंह यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.  त्यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती आहे. ही बाब उघड होताच मुलगा त्यांचे कुटुंब भावुक झाले आहेत. अर्चना यांचा मुलगा आयुषमान सेठी याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तो भावुक झाला असल्याचं दिसून येत आहे. सध्या आयुषमान सेठीची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

काही काळापूर्वी अर्चना पूरण सिंह यांच्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असल्याची  माहिती आहे. ज्यामध्ये हाडाला फ्रॅक्चर झाले होते. मात्र हे प्रकरण इथेच थांबले नाही. शस्त्रक्रियेनंतर अर्चना यांना कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम या अत्यंत दुर्मिळ आजाराचे निदान झाले होते. हा आजार दुर्मिळ मानले जाते. या आजारामध्ये ज्या भागाला दुखापत होते, त्या भागात तीव्र वेदना होते.  त्या भागात सूज, नसांमध्ये जळजळ जाणवत असते. त्यामुळे रुग्णाला दीर्घकाळ शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागच असल्याची माहिती आहे.

आयुषमानकडून व्हिडिओ व्हायरल

आयुषमानने आई अर्चना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे. या व्हिडिओला त्यानं कॅप्शन दिलं आहे.  या व्हिडिओत अर्चनाच्या हातावर  प्लासटर दिसत आहे.  या व्हिडिओत आयुष्मान म्हणतो, "माझ्या आईच्या हाताची स्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. यावर डॉक्टर म्हणाले की, या आजारामुळे तिच्या जखमी झालेल्या हातावर मर्यादा येऊ शकतात. मात्र, तिला कायमस्वरूपी  वेदना सहन कराव्या लागू शकतात.  आईनं आयुष्यभर मला हसवलंय.  पण तिला वेदनेत पाहणं माझ्यासाठी खूप कठीण आहे", असं आयुषमान म्हणाला.

आयुषमानची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून अर्चनाच्या आजारपणाबाबत कळताच अर्चना यांचे चाहते चिंतेत आहेत. त्यांनी कमेंट करून अर्चना यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली  आहे.  दरम्यान, अनेक कलाकारांनी अर्चना यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर, काहींनी अर्चना यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

"बाई काय हा प्रकार"; बॉलिवूड अभिनेता नग्न अवस्थेत झाडावर चढला, VIDEO सोशल मीडियात तुफान व्हायरल