Chirag Paswan on Bollywood : लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केल्यानंतर राजकारणाकडे वळले. सध्या ते राजकारणात चांगले स्थिरावले असून मोदी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देखील देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री झाल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. पण नुकतच एका मुलाखतीमध्ये पुन्हा सिनेमांकडे वळणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


चिराग पासवान यांनी त्यांच्या सिनेमाच्या कारकिर्दिमध्ये एकच सिनेमा केला. तो सिनेमा देखील त्यांनी अभिनेत्री कंगना रणौतसोबत केला. त्यामुळे यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुन्हा सिनेमाकडे वळणार की नाही? यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. 


चिराग पासवान यांनी काय म्हटलं?


 सिनेमाकडे परतण्याविषयी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'माझा तो चित्रपट 'निरुपयोगी' होता आणि मला वाटते की ज्याने हा चित्रपट पाहिला आहे तो माझ्याशी सहमत असेल.' या सिनेमामुळे मला आयुष्यात काय करु नये हे शिकवले. स्वतः कंगनासह कोणताही दिग्दर्शक, निर्माता माझ्यासोबत चित्रपट करण्यास राजी होणार नाही. कंगना देखील माझ्यसोबत सिनेमे करणार नाही, कारण मी किती वाईट अभिनेता आहे ते. 


या सिनेमात कंगना आणि चिराग यांनी एकत्र काम केलं होतं


कंगना आणि चिरागने 'मिले ना मिले हम' या चित्रपटात एकत्र काम केले होते. चिराग पासवानचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. कंगनाने आपला अभिनय प्रवास सुरू ठेवला आणि इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र नापास ठरला. पण कंगना आणि चिराग चांगले मित्र झाले.                                                                                         






ही बातमी वाचा : 


Marathi Movie : हिंदी अभिनेत्रीचं मराठीत पदार्पण, चॉकलेट बॉयसोबत जमली जोडी; भूषण प्रधान-निकिता दत्ता प्रेक्षकांच्या भेटीला