Aaryan Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याचे आनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच आर्यनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. 


आर्यनचा व्हायरल व्हिडीओ


आर्यन खाननं एका बर्थ-डे पार्टीला हजेरी लावली. यावेळी आर्यनचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सनं गर्दी केली. या बर्थ-डे पार्टीसाठी आर्यननं खास लूक केला होता. त्याच्या या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे. बर्थ-डे पार्टीला आर्यननं ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक पँट असा लूक केला होता. त्याच्या एका व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


आर्यनच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'पोलिसांनी एवढं धुतलं की त्याचा कपडे फाटले.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, याचे कपडे उंदारानं खाल्ले आहेत का?', 'हा एवढा अॅटिड्यूड का दाखवत आहे?' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. 






आर्यन लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी आर्यननं या नव्या प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानं क्लॅप बोर्ड आणि स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलं, 'लिखाण झालं आहे, आता अॅक्शन म्हणायची वाट बघत आहे' आर्यनच्या या पोस्टला कमेंट्स करुन अनेकांनी त्याच्या आगमी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या. गौरी खान, रितेश देशमुख आणि शाहरुख खान यांनी आर्यनच्या या पोस्टला कमेंट केल्या. 


आर्यन खानला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर त्याला क्लीनचिट मिळाली. या सर्व प्रकरणावर गौरी खाननं कॉफी विथ करण या शोमध्ये प्रतिक्रिया दिली होती. 'कठीण काळात आमचे मित्र आणि अनेक लोक एकत्र उभे राहिले ज्यांना आम्ही ओळखत नाही ते लोक देखील आमच्यासोबत होते. आम्हाला यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांचे मी आभार मानते.' असं गौरीनं या कार्यक्रमामध्ये सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aaryan Khan : एनसीबीकडून क्लीन चिट मिळालेला आर्यन खान मित्रांसोबत करतोय पार्टी; क्लबमधील व्हिडीओ व्हायरल