Chhava Movie Teaser Vicky Kaushal :  छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचे रक्षणकर्ते असलेल्या छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर छावाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'छावा'चा धडाकेबाज टीझर रिलीज झाला असून विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. 


बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडणाऱ्या विकी कौशलचा आगामी चित्रपट 'छावा' मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. थिएटरमध्ये स्त्री 2 सोबत छावाचा ट्रेलर दाखवण्यात आला होता. सोशल मीडियावर हा टीझर व्हायरल झाल्यानंतर आता निर्मात्यांनी अधिकृतपणे हा छावाचा टीझर आउट केला आहे. 


विक्की कौशलने 'छावा' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर छावाची टक्कर पुष्पा 2 सोबत आहे. 






कसा आहे टीझर?


'छावा' चा टीझर आज लाँच करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. टीझरमध्ये विकी कौशलचा लूक, अॅक्शन पाहून त्याने या चित्रपटासाठी मेहनत घेतली असल्याचे दिसून आले आहे. डोळ्यात आग, स्वराज्य रक्षणाचा ध्यास घेतलेले छत्रपती संभाजी महाराज हे मुघली सैन्याशी दोन हात करताना दिसत आहे. औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक जबरदस्त दिसून आला आहे.


विकी कौशलच्या या लूकवर आणि अॅक्शनवर चाहते फिदा झाले असून त्याचे कौतुक केले आहे. विकी कौशलने टीझर शेअर करताना म्हटले की, स्वराज्याचे रक्षक, धर्माचे रक्षक, छावा- एका साहसी योद्ध्याची महाकाव्य गाथा! 






'छावा'ची स्टारकास्ट 


'छावा' चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, औरंगजेबची भू्मिका अक्षय खन्ना साकारणार आहे. आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते, दिव्या दत्ता ही सोयराबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय, या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि नील भूपालम दिसणार आहेत.