Sonu Sood On Chandigarh University MMS Scandal : पंजाबमधील (Punjab) मोहाली येथील चंदीगढ विद्यापीठातील (Chandigarh University) विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणावर आता अभिनेता सोनू सूदनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. 


सोनू सूद ट्वीट करत म्हणाला आहे की,"चंदीगढ विद्यापीठात घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. आता आपल्या बहिणींच्या पाठीशी उभं राहून एक जबाबदार समाजाचं कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे. ही आपल्यासाठी निर्णायक वेळ आहे. जबाबदारीनं वागा". सोनू सूदचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. 










नेमकं प्रकरण काय?


मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीनं 60 विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शिमल्यात राहणाऱ्या एका मित्राला पाठवले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोठा गोंधळ घातला. त्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तरुणींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण आता याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण देत कोणत्याही तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एमएमएस बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. 


संबंधित बातम्या


मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल, एका मुलीनेच व्हायरल केले व्हिडीओ


Mohali University Case : मोहालीत विद्यार्थिंनींचे व्हिडीओ काढणारी विद्यार्थिनी ताब्यात