Chahat Fateh Ali Khan Break Out :  पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान (Chahat Fateh Ali Khan ) यांच्या  'बदो बदी' या गाण्याविरोधात युट्युबने कठोर कारवाई केली आहे. युट्युबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे गाणं डिलीट केले आहे. 28 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेले हे गाणं डिलीट झाल्याने गायक चाहत फतेह अली खान ढसा ढसा रडले. त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यावर अनेक रील्स आले.


 






युट्युबने का डिलीट केले गाणं?


'डेक्कन हेराल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, चाहत फतेह अली खान यांच्या गाण्याने कॉपीराइटचे उल्लंघन केले असल्याची तक्रार युट्युबकडे आली होती. त्यानंतर युट्युबने याची पडताळणी करत चाहत फतेह अली खान यांच्या चॅनेलला कॉपीराईट स्ट्राइक पाठवले आणि  गाणं डिलीट केले. 


कॉपीराईट स्ट्राइक का आले?


चाहत फतेह अली खानच्या 'बदो बदी' या गाण्याचे बोल नूरजहाँच्या 1973 मध्ये आलेल्या 'बनारसी ठग' या चित्रपटातील गाण्यासारखेच होते, म्हणून YouTube ने कॉपीराइट नियम लक्षात घेऊन 'बदो बदी' हे गाणं आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले.






चाहत फतेह अली खान यांचे गाणं व्हायरल... 






बदो बदी या गाण्यात चाहत फतेह अली खान यांच्यासोबत एक मॉडेलही दिसून आली. या मॉडेलचे नाव वजदान राव असे सांगण्यात आले. हे गाणं व्हायरल झाले तेव्हा काहींनी यावर मीम्स तयार केले होते. तर काहींनी चाहत आणि वजदान यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. भारत-पाकिस्तानमधील अनेक सेलेब्सने या गाण्यावर रील्स तयार केले. 


इतर महत्त्वाची बातमी :