Bruce Lee: मार्शल आर्ट सुपरस्टार आणि फिल्म दिग्दर्शक ब्रूस लीचा (Bruce Lee) चाहता वर्ग मोठा आहे. ब्रूस लीचं निधन होऊन 49 वर्ष झाली आहेत. जगभरातील प्रेक्षक आजही ब्रूस लीचे चित्रपट आवडीनं बघतात. 20 जुलै 1973 रोजी ब्रूस लीनं वयाच्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता 49 वर्षांनंतर ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं आहे. काही शास्त्रज्ञांच्या टीमनं ब्रूस लीच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे.


ब्रूस लीचा मृत्यू सेरेब्रल एडेमा (मेंदूला सूज) झाल्यामुळे झाला, असं आतापर्यंत काही लोक म्हणत होतं. पण, शास्त्रज्ञांच्या एका टीमने आता अशी माहिती दिली आहे की, ब्रूस लीचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्यामुळे झाला. 


क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये लिहिण्यात आले की, 'उपलब्ध असलेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे असं म्हटलं जाऊ शकतं की,  ब्रूस लीच्या मृत्यूचे कारण हायपोनेट्रेमियामुळे सेरेब्रल एडेमा होते.' 


लिक्वीड डाएट फॉलो करत होता ब्रूस ली
एका रिपोर्टनुसार, अशी माहिती मिळाली आहे ज्यावरून असे दिसून आले आहे की ब्रूस ली हा लिक्वीड डाएट करत होता. त्याच्या आहारात तो प्रोटीनयुक्त पेये घेत होता, ज्यामुळे तहान वाढते.' एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, 'शरीरातील पाण्याचे सेवन आणि पाणी बाहेर येणे या दोन्हींवर नियंत्रण ठेवणाऱ्या होमिओस्टॅसिस यंत्रणेतील समस्यांमुळे ब्रूस लीला हायपोनाट्रेमिया नावाच्या आजाराचा धोका वाढला होता.'


 ब्रूस लीनं 'एंटर द ड्रॅगन' या हॉलिवूड चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हा ब्रूस लीच्या फिटनेसनं आणि अॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधलं.   






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 19 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!