मुंबई: क्रिकेटच्या मैदानात आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्यांना हादरवणारा, ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
अनुपम शर्मा दिग्दर्शित 'अनइंडियन' या सिनेमातून तो रुपेरी पडदयावर झळकणार आहे. येत्या पाच ऑगस्टला हा सिनेमा पडद्यावर झळकणार आहे.
या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसेल.
एका मुलाची आई असलेली मीरा आणि ऑस्ट्रेलियन शिक्षक वील यांची प्रेमकथा या सिनेमात पाहायला मिळेल. तनिष्ठा आणि ब्रेट ली या दोघांबरोबरच भारतातले आणि ऑस्ट्रेलियातले अनेक कलाकार या सिनेमा दिसतील.