मुंबईः ऑस्ट्रेलियाचा माजी जलद गोलंदाज ब्रेट लीने 'भाबीजी घर पर है' या हिंदी मालिकेच्या सेटवर हिंदी शिकण्याचा अनुभव घेतला. ब्रेट ली आगामी 'अनइंडियन' सिनेमाच्या प्रमोशनसाठी मालिकेच्या सेटवर आला होता.
हिंदी कलाकारांकडून हिंदी शिकल्यानंतर ब्रेट लीने हिंदी शिकणं हा चांगला अनुभव असल्याचं मत व्यक्त केलं. 'भाबीजी घर पर है' मालिकेती सौम्या आणि शुभांगी या दोन्ही माझ्या आवडत्या कलाकार आहेत. 'भाबीजी घर पर है'च्या संपूर्ण टीमसोबत मजा आली, असं ब्रेट लीने बोलताना सांगितलं.
ब्रेट लीने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून निवृत्ती घेतल्यानंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'अनइंडियन' या सिनेमातून ब्रेट ली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'अनइंडियन' सिनेमात ब्रेट ली मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी त्याच्यासोबत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुपम शर्मा यांनी केलं आहे.