Boyz 4 Box Office Collection: बॉईज, बॉईज 2, बॉईज 3 या चित्रपटांच्या यशानंतर बॉईज-4 (Boyz 4) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटामधील संवाद तसेच चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.'बॉईज 4' चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले. 'बॉईज 4' चित्रपट रिलीज होऊन आता दहा दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...


बॉक्स ऑफिस कलेक्शन


नुकतीच अभिनेता  पार्थ भालेरावनं (Parth Bhalerao) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन 'बॉईज 4'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगितलं आहे. या चित्रपटात दहा दिवसात 4.20 कोटींची कमाई केली आहे. पार्थनं या पोस्टला कॅप्शन दिलं, "बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! सुपरहिट 'Boyz4' ची धमाकेदार कमाई.."


'बॉईज 4' ची स्टार कास्ट


'बॉईज 4' या चित्रपटामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबतच ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.






2017 मध्ये 'बॉईज' हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर  2018 मध्ये 'बॉईज 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'बॉईज 3' हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला. आता बॉईज- 4 हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.


विशाल सखाराम देवरूखकर यांनी बॉईज- 4 या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. चित्रपटातील   'ये ना राणी तू ये ना ' या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता बॉईज- 5 चित्रपट कधी रिलीज होणार? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Boyz 4 Trailer: बॉईज आर बॅक! 'बॉईज 4' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज