मुंबई : ‘बादशाहो’ सिनेमाने पहिल्या तीन दिवसातच जबरदस्त कमाई केली आहे. तीन दिवसात 43 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. मार्केट अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटवरुन याबाबत माहिती दिली.

‘बादशाहो’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्यानंतर कमाई खालीलप्रमाणे :

  • शुक्रवार – 12.60 कोटी रुपये

  • शनिवार – 15.60 कोटी रुपये

  • शनिवार – 15.10 कोटी रुपये


https://twitter.com/taran_adarsh/status/904577742091436032

सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून अभिनेता अजय देवगन याने ट्विटरवरुन चाहत्यांचे आभार मानले. “बादशाहो सिनेमावरील प्रेम आणि प्रतिसाबद्दल आभार. तुमचं कौतुक करण्यापलिकडे देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही.”, असे अजयने म्हटलं आहे.

भारतातील एकूण 2800 स्क्रीनवर, तर परदेशात 442 स्क्रीनवर बादशाहो सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.

अजय देवगन, इम्रान हाश्मी, इलियाना डीक्रुज आणि ईशा गुप्ता यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. आणीबाणीच्या काळात या सिनेमाचं कथानक घडतं.

दुसरीकडे अयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाही रिलीज झाला आहे आणि त्या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या आहेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत नाही.