Bollywood Stars : बॉलिवूडमध्ये (Bollywood) भूत-प्रेत अशा गोष्टींवर भाष्य करणारे अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. यातील काही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत. भूतासारख्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारा मोठा वर्ग आहे. पण भूत पाहूण घाबरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी भयपटात काम केलं आहे. यातील काही सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यात भूत पाहून हादरले आहेत. सनी लिओनी (Sunny Leone), बिपाशा बसू (Bipasha Basu), इमरान हाशमी (Emraan Hashmi), वरुण धवन (Varun Dhawan), सोहा अली खान (Soha Ali Khan) ते गोविंदापर्यंत (Govinda) अनेक कलाकारांचा यात समावेश आहे.


बिपाशा बसू (Bipasha Basu) :


बॉलिवूडच्या अनेक भयपटांमध्ये बिपाशा बसूने काम केलं आहे. बिपाशाला खऱ्या आयुष्यातही भूत दिसला आहे. 'राज' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका हॉटेलमध्ये बिपाशाला भूत दिसला होता. 


इमरान हाशमी (Emraan Hashmi) : 


इमरान हाशमीनेदेखील अनेक भयपटांमध्ये काम केलं आहे. रील लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्येही त्याला भूतांचा सामना करावा लागला आहे. इमरान माथेरान हिल स्टेशनमध्ये असताना एका हॉटेलमध्ये त्याला भूत दिसलं होतं. 


सनी लिओनी (Sunny Leone) :


बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी राजस्थानमध्ये शूटिंग करत होती. त्यावेळी रात्री हॉटेलच्या खोतीत तिला भूत असल्याचा भास झाला होता. तिसऱ्यांदा भास झाल्यानंतर ती जोरजोरात ओरडू लागली होती. 


वरुण धवन (Varun Dhawan) :


वरुण धवनने 'एबीसीडी-2' या चित्रपटाचं शूटिंग लॉस वेगासमध्ये केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मध्यरात्री त्याला गाण्याचा आवाज ऐकू येत होता. तसेच त्याच्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्यादेखील आपोआप बंद चालू होत होत्या. 


सोहा अली खान (Soha Ali Khan)


'गँग ऑफ घोस्ट' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोहा अली खान भूत पाहून घाबरली होती. 


गोविंदा (Govinda)


कॉमेडी किंग गोविंदादेखील खऱ्या आयुष्यात भूत पाहून हादरला होता.


नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) : 


'आत्मा-फील इट अराऊंड यू' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीला भूत असल्याचा भास झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नवाजला एका महिलेचा गातानाचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे 'आत्मा'च्या चित्रीकरणादरम्यान नवाज पूर्णपणे घाबरलेला होता.


रणवीर सिंह (Ranveer Singh) : 


'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर सिंहला बाजीराव पेशवा यांचा आत्मा दिसला होता. डेकिन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याबद्दल भाष्य केलं आहे.


संबंधित बातम्या


Bollywood Item Girl : बॉलिवूडची सर्वात महागडी 'आयटम गर्ल' कोण? एका 'Item Song'साठी घेते कोट्यवधी रुपये