मुंबई: उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले आहेत. या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परण्यासाठी अल्टिमेटम दिलं होतं. यावर बॉलिवूडमधून संमिश्र प्रतिक्रीया उमटत होत्या. त्यातच 'इम्पा' म्हणजेच चित्रपट निर्मात्या संघटनेनं पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतर पाक अभिनेता फवाद खानने भारतातून गूपचूपणे पलायन केलेले, मात्र आता तो चांगलाच आक्रमक झाला आहे.


बॉलीवूड कोणाच्या बापाचं नाही, असं वादग्रस्त विधान त्यानं केलं आहे. स्पॉटबॉय या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हे विधान केलंय.फवादच्या या वक्तव्यावर इम्पाचे अध्यक्ष आणि निर्माता अग्रवाल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पाकिस्तानी कलाकार भारतात एक बोलतात आणि पाकिस्तानात आपला राग व्यक्त करतात असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारतातून गुपचूप पलायन?

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका

चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे: सैफ अली खान

पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद

अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

सलमानकडून पाक कलाकारांचं समर्थन, मनसेकडून फक्त निषेध!

सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात

फोटो: सलमानच्या 'त्या' वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट 

सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना