मुंबई : एके काळी आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ट्विटरवर पत्रकार महिलेविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटची दखल मुंबई पोलिस आणि सायबर क्राईम विभागाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.


 
पत्रकार स्वाती चतुर्वेदी आणि जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांना अभिजीत यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले. चेन्नईतील इंजिनिअर तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा करत अभिजीत यांनी ट्वीट केलं. प्रत्यक्षात संशयित आरोपी मुस्लिम नसल्याचं वृत्त आहे.

 
अभिजीत धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ट्वीट स्वाती चतुर्वेदी यांनी केलं. यामध्ये मुंबई पोलिसांना मेन्शन करुन अभिजीत विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.

 
यावरुन संतापलेल्या अभिजीत यांनी 'निर्लज्ज म्हातारे' अशा शब्दात स्वातींवर गरळ ओकली. तू पाकिस्तानींचे पंजे चाटत असल्याचं म्हणत अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली. जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांनी या वादात उडी घेत 'किती संस्कारी आहात' असा खोचक टोला मारला. यावरही अभिजीतने 'हो आम्ही भारतीय पाकिस्तानींना लाथ मारतो, हेच आमचे संस्कार आहेत' असं प्रत्युत्तर दिलं.

 

 

https://twitter.com/abhijeetsinger/status/749258258188296192

 
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे जवळच्या पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही दिला आहे.

 

https://twitter.com/MumbaiPolice/status/749263916241395712