मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या विवाहाचा शूभमुहूर्त ठरला असून सप्टेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू असून लग्न मुंबईत किंवा दिल्लीत होणार आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने हे कपल विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. 


रिचा चढ्ढा आणि अली फजल हे 2021 सालीच विवाहबंधनात अडकणार होते. पण कोरोनाची साथ सुरू असल्याने त्यांचा विवाह लांबणीवर पडला. मार्चमध्ये त्यांचं लग्न होणार अशी अफवाही या आधी पसरली होती. आता सप्टेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. 


रिचा चढ्ढा आणि अली फजलने 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झालं. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकत्र राहतात आणि व्हेकेशनही एकत्र घालवतात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. 


रिचा आणि अली फजल येत्या काळात 'फुकरे-3' मध्ये एकत्रित दिसणार आहेत. अली फजल हॉलिवूडमधील 'डेथ ऑन द नाईल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच मिर्झापूरच्या पुढच्या सीजनच्या चित्रिकरणातही तो व्यस्त आहे. रिचा चढ्ढा सध्या दोन चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त असून 'फुकरे 3' आणि 'अभी तो पार्टी शुरू हुई है' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच रिचा चढ्ढा आणि अली फजल हे दोघे मिळून 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: