आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिला चित्रपट क्षेत्रात अभिनेत्री म्हणून नाव कमवायचं होतं. मात्र, सर्व काही ठीक चालू असताना अचानक एका दिवशी अपघाताने तिचं नशिब बदलले. आपण बोलत आहोत अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar) यांच्याविषयी. ज्या एक थोबाडीत बसल्यामुळे चित्रपटसृष्टीतली सर्वात प्रसिद्ध व्यक्तिरेखा बनली. तिच्या नकारात्मक भूमिकेची छाप अशी होती की आजपर्यंत लोक तिच्या अभिनयाचे कौतुक करतात.




ललिता पवार वयाच्या 9 व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये सक्रिय होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी सुमारे 700 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार ललिता यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं, पण 1942 मध्ये 'जंग ए आज़ादी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत जे घडलं त्यानं तिचं नशीब पालटून टाकलं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान को-स्टार भगवान दादांनी ललिताला इतक्या जोरात थोबाडीत मारली की त्यांच्या कानचा पडदा फाटला आणि एका डोळ्याला गंभीर जखम झाली.




असे म्हणतात की योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे ललिता पवार यांचा एक डोळा कायमचा जखमी झाला, त्याचबरोबर शरीराच्या एका भागाला दुखापत झाल्याने अर्धांगवायू झाला होता. काही काळानंतर, जेव्हा ललिता पवारने पुनरागमन करण्याचा विचार केला, तेव्हा त्यांना हे कळून चुकलं की त्यांचे नायिका होण्याचे स्वप्न कायमचे भंगले आहे. मात्र, ललिता यांनी हार न मानता चरित्र भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. रामानंद सागर यांच्या सर्वात मोठ्या 'रामायण' या मालिकेत ललिता पवार यांनी साकारलेल्या मंथराची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.


ललिता पवार यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये अनाडी, परछाईं, श्री 420 मिस्टर एंड मिसेज 55 इत्यादींचा समावेश आहे. अभिनेत्री ललिता पवार यांनी 24 फेब्रुवारी 1998 रोजी या जगाला कायमचा निरोप घेतला.