Bollywood Couples Nik Names : बॉलिवूड मनोरंजनसृष्टीत अनेक जोड्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. त्यातील काहींनी खऱ्या आयुष्यात संसार थाटला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी, रणवीर सिंह-दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, विकी कौशल-कतरिना कैफ, अमिताभ बच्चन-जया बच्चन अशा अनेक जोड्या प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरतात. 


सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)


सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल आहे. सप्टेंबर 2023 मध्ये कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले. नुकतेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात सिद्धार्थ सहभागी झाला होता.  त्यावेळी त्याने पत्नीच्या निक नेमबद्दल खुलासा केला. सिद्धार्थ म्हणाला,"मी कियाराला लव्ह, बे आणि की या नावाने हाक मारतो". 


रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण (Ranveer Singh Deepika Padukone)


रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बी-टाउनमधील लोकप्रिय कपल आहे. रणवीर आणि दीपिकाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर आणि दीपिका 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली. सार्वजनिक ठिकाणी रणवीर दीपिकाला दीपू म्हणून हाक मारतो. पण रणवीरने दीपिकाला प्रेमाने तितली अशी हाक मारतो. 


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan Aishwarya Rai)


बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची जोडी मेड फॉर इच अदर आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. अभिषेक अनेकदा ऐश्वर्याचं कौतुक करताना दिसून येतो. अभिषेक ऐश्वर्याला प्रेमाने 'ऐश' अशी हाक मारतो. 


विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal Katrina Kaif)


विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. राजस्थानात राजेशाही थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. नुकत्याच एका मुलाखतीत विकी कौशल म्हणाला की,"कतरिनाला मी पैनिक बटन असं म्हणतो. कतरिना लगेच एखाद्या गोष्टीवरुन हैराण होते. त्यामुळे मी तिला हे नाव दिलं आहे. 


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Amitabh Bachchan Jaya Bachchan)


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. अमिताभ बच्चन जया बच्चनला सार्वजनिक ठिकाणीदेखील टोपन नावाने हाक मारतात. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांचं नाव 'देवी जी' असं ठेवलं आहे.


संबंधित बातम्या


Year Ender 2023 : बॉक्स ऑफिसवर सिनेमांची मांदीयाळी! 2023 मध्ये रिलीज झालेल्या A टू Z मराठी चित्रपटांबद्दल जाणून घ्या