Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याची देशातील नागरिक उत्साहानं वाट बघत आहेत. 22 जानेवारीला मंदिरात रामललाची स्थापना होणार आहे.  या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोक अयोध्येमध्ये जात आहेत.  राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे.


दिग्गज कलाकारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण 


राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.




बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना आमंत्रण (Bollywood And South Film Invited For Ayodhya Ram Mandir Inauguration)


22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.  रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, दीपिका पदुकोण, अजय देवगण यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय अभिनेता प्रभास, रजनीकांत, यश आणि धनुष या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना देखील आमंत्रण मिळाले आहे.




दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांनाही मिळालं आमंत्रण


बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनाही उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध निर्माता महावीर जैन यांच्याशिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी, ​​संजय लील भन्साळी, रोहित शेट्टी, चिरंजीवी आणि ऋषभ शेट्टी यांच्या नावाचा समावेश आहे.


क्रिकेटपटू आणि उद्योगपतींनाही करण्यात आलं आमंत्रित


राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि साऊथ स्टार्सशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना देखील  आमंत्रित करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी अनेक क्रिकेटपटू आणि उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा यांच्या नावांचा समावेश आहे. 




राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे 100 सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 25 अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
पंढरपूर येथील व्यक्तींना आमंत्रित करताना वारकरी परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना आमंत्रित केल्याने विशेष आनंद या मान्यवरांनी व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळा, महाराष्ट्रात आतापर्यंत कोणाला मिळालं आमंत्रण?