नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडकरांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली.

ओम पुरींच्या सिनेमांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

https://twitter.com/PMOIndia/status/817221430974652416

ओम पुरींना मी गेल्या 43 वर्षांपासून ओळखतो, ते नेहमी माझ्यासाठी एक महान कलाकार आहेत आणि राहतील. शिवाय त्यांना संपूर्ण जगही एक महान कलाकार म्हणून पाहिल, असं अभिनेते अनुपम खेर म्हणाले.

https://twitter.com/AnupamPkher/status/817220573021536256

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही ओम पुरींना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/virendersehwag/status/817220140232228865

सिनेसृष्टीने एक महान कलाकार गमावला, असं निर्माता करण जोहर म्हणाला.

https://twitter.com/karanjohar/status/817216496615256064

ओम पुरींच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला, त्यांच्यासोबत 'अर्धसत्य' सिनेमासह अनेक सिनेमात काम केलं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात अभिनेत्री माधुरी दीक्षितने श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/MadhuriDixit/status/817225315118358529

ओम पुरींच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. ते माझ्यासोबत अनेक सिनेमात सहकलाकार म्हणून होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं अक्षय कुमार म्हणाला.

https://twitter.com/akshaykumar/status/817227823412867072

तुमच्या अष्टपैलू गुणांनी जी छाप सोडली आहे, ती नेहमी आमच्या हृदयात राहिल, अशा शब्दात सचिन तेंडुलकरने ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/sachin_rt/status/817243619895767040

ओम पुरींच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, एक चांगला मित्र, चांगला सहकारी गमावल्याचं दुःख आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

https://twitter.com/SrBachchan/status/817260504821288963

ओम पुरी भारतीय सिनेमातील एक प्रतिभावान कलाकार आहेत, त्यांनी साकारलेल्या अविस्मरणीय भूमिका नेहमी लक्षात राहतील, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/OfficeOfRG/status/817249906049982464

आता फक्त आठवणीच उरल्या आहेत, असं म्हणत अभिनेता अजय देवगनने ओम पुरींना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली

https://twitter.com/ajaydevgn/status/817281938448846848