मुंबई :  आपल्या अप्रतिम अभिनयामधून आगळ्यावेगळ्या आणि पारंपरिक साच्याबाहेरच्या भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये वेगळाच ठसा उमटवला आहे. बॉलिवूडची ही बहारदार अभिनेत्री आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ती आज 34 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 


तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. अक्षय कुमारच्या 'बेबी' या चित्रपटातील एका लहानशा भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली परंतु 'पिंक' या चित्रपटातील भूमिकेमुळे ती यशाच्या शिखरावर गेली. जाणून घेऊया तिच्या काही महत्वाच्या चित्रपटांबद्दल... 


पिंक
अनिरुद्ध रॉय चौधरी याची निर्मिती असलेला 'पिंक' हा एक लीगल थ्रीलर चित्रपट होता. यामध्ये तापसीसोबत अमिताभ बच्चन, अंगद बेदी हेही होते. हा चित्रपट म्हणजे एक कोर्टरुम ड्रामा असून त्यामध्ये तापसी एका स्वतंत्र्यपणे जगणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसते. समाजात मुलींशी कशा प्रकारचा व्यवहार केला जातोय हे या चित्रपटातून मांडलं आहे. 


मनमर्जिया
तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन, विकी कौशल यांची भूमिका असलेला 'मनमर्जिया' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला. अनुराग कश्यपने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे. यामध्ये तापसीने आपल्या लव्ह लाईफ बद्दल कन्फूज असलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. यामध्ये तापसी, अभिषेक आणि विकी कौशल यांची केमेस्ट्री चांगलीच जमली आहे. 


बदला
या चित्रपटात तापसीने नकारात्मक भूमिका साकारली आहे. ही चित्रपट म्हणजे एक मिस्ट्री थ्रिलर आहे. या चित्रपटात तापसीसोबत अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग आहे. या चित्रपटामध्ये तापसीने खूपच चांगला अभिनय केल्याची चर्चा झाली. 


सांड की आंख
शूटर दादीवर आधारित या बायोपिकमध्ये तापसी पन्नी आणि भूमी पेडणेकर यांनी काम केलं आहे. त्यांच्या या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 


थप्पड
2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थप्पड' या तापसी पन्नूच्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटाची कथा एका विवाहित महिलेची आहे, ज्यामध्ये तिला मारहाण करण्यात येते. त्यामुळे ती महिला आपल्या विवाह बंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेते. तापसी पन्नने या चित्रपटात अप्रतिम भूमिका साकारली आहे. 


महत्वाच्या बातम्या :