Sunny Leone Net Worth : बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सगळ्यांनाच यश मिळत नाही. काहींच्या वाटेला भरभरून यश येते. तर, काहींना अपयश मिळते. काहींना फारसं यश मिळाले नाही तरी त्यांची चर्चा मात्र होत असते.  अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तेव्हा जोरदार चर्चा सुरू झाली होती. आयटम साँग आणि मॉडेलिंग फोटोशूटमुळे सनी लिओनी कायमच चर्चेत होती. सनी लिओनीने काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. मात्र, तिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करता आली नाही. सनी लिओनी सध्या चित्रपटसृष्टीपासून सध्या दोन हात लांब आहे. तरीदेखील तिची संपत्ती ही 115 कोटींच्या घरात आहे. सनी लिओनीही व्यावसायिक असून तिची अनेक ठिकाणी गुंतवणूक आहे. 



स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँड


2016 मध्ये सनी लिओनीने तिचा स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँड लॉन्च केला. या ब्रँडची प्रोडक्टस महागडी आहेत. 


वीगन कपड्यांचा ब्रँड


सनी लिओनीने 2021 मध्ये वीगन कपड्यांच्या ब्रँडमध्येही गुंतवणूक केली होती. त्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कपड्यांचा ब्रँड 100% वीगन आहे.


परफ्यूम ब्रँड


कॉस्मेटिक ब्रँडशिवाय, सनी लिओनीने दोन नवीन ब्रँडसह परफ्यूम व्यवसायातही प्रवेश केला आहे.






ऑनलाइन गेम


2018 मध्ये सनी लिओनीने  तिचा स्वतःचा ऑनलाइन गेम लॉन्च करण्यासाठी एका ऑनलाइन गेम डेव्हलपमेंट कंपनीसोबत भागीदारी केली असल्याचे वृत्त बिझनेस इनसाइडरने दिले होते.


वेब-बेस्ड शॉर्ट स्टोरीज


सनी लिओनीचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. जुगरनॉट बुक्सचे संस्थापक चिकी सरकार यांच्या सहकार्याने 2019 मध्ये या अभिनेत्रीने 12 स्वीट ड्रीम्स पुस्तके लिहून कंटेंट क्षेत्रातही प्रवेश केला.


फुटबॉल टीमची सह-मालक


मिड-डे मधील वृत्तानुसार, सनी लिओनने कोविड महासाथीच्या  सुरुवातीच्या टप्प्यात यूएसला रवाना होण्याच्या काही दिवस आधी यूके स्थित आयपीएल फुटबॉल संघात गुंतवणूक करत सह-मालकी घेतली होती.


एनएफटी


इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, 2021 मध्ये डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणारी आणि स्वतःचा NFT तयार करणारी सनी लिओनी ही पहिली भारतीय अभिनेत्री बनली.


महिलांसाठी विशेष  वेब पोर्टल


2019 हे वर्ष सनी लिओनीसाठी उत्तम वर्ष ठरले कारण तिने ऑनलाइन मीडियासह अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून तिचा व्यवसाय पोर्टफोलिओ वाढवला. इकॉनॉमिक टाइम्सनुसार, ती महिलांच्या फॅशन आणि जीवनशैली वेबसाइटमध्ये इक्विटी गुंतवणूकदार आहे.


चेन्नई स्वॅगर्स


सनी लिओनीकडे सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग संघ चेन्नई स्वॅगर्सची मालकी आहे. या संघाने एकता कपूरच्या रिॲलिटी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता.


प्रॉडक्शन हाऊस


सनीने पती डॅनियल वेबरसोबत सनसिटी मीडिया आणि एंटरटेनमेंट हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबतीने सनीने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. 


अभिनयासाठीचे मानधन


2012 मध्ये पूजा भट्टच्या 'जिस्म 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लिओनीने तिच्या करिअरमध्ये खूप मोठा पल्ला गाठला आहे. CAKnowledge नुसार, ती आता एका प्रोजेक्टसाठी सुमारे 1.2 कोटी रुपये मानधन आकारते.