LIVE UPDATE : श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट
एबीपी माझा वेब टीम | 27 Feb 2018 09:02 AM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत मुंबई येण्याची शक्यता आहे.
दुबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत मुंबई येण्याची शक्यता आहे. गेल्या 55 तासापासून श्रीदेवीचं पार्थिव दुबईमध्ये शवागारात ठेवण्यात आलं आहे. सरकारी वकिलांच्या परवानगीनंतरच श्रीदेवीचं पार्थिव मुंबईला आणता येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रत्येक माहिती तुम्हाला एबीपी माझावर मिळेल. LIVE UPDATE : 04:03 PM: श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नाही, बोनी कपूर यांनाही दुबई पोलिसांकडून क्लीनचिट, दुबईच्या सरकारी वकिलांकडून केस बंद 02:42 PM: श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यास दुबई पोलिसांची अखेर परवानगी, कुटुंबीयांसह बोनी कपूर भारतात परतणार 01:00 PM: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर दुबईला रवाना 09:00 AM: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पुन्हा एकदा शवविच्छेदन केली जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडिया आणि दुबईच्या खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर दुबईतील सरकारी वकिलांना गरज वाटल्यास ते पुन्हा एकदा श्रीदेवीच्या शवविच्छेदनाचे आदेश देऊ शकता. 06: 20AM: दुबई पोलिसांनी श्रीदेवीचा पती बोनी कपूर याचीही चौकशी केली. सुत्रांच्या माहितीनुसार, ही सामान्य चौकशी होती. चौकशीनंतर पोलिसांनी बोनी कपूरला सोडून दिलं. तसंच त्याच्याकडून एक अंडरटेकिंगही घेतलं गेल्याची शक्यता आहे. जेणेकरुन पोलिसांना जेव्हा गरज पडेल तेव्हा चौकशीसाठी बोनी कपूरला यावं लागेल. ज्या हॉटेलमधील रुममध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला. ती खोली पोलिसांनी सील केली आहे. तसंच पोलीस श्रीदेवीचे कॉल डिटेल्सही तपासत आहेत. 06:10 AM: आज सकाळी 10 वाजेपर्यंत जर सरकारी वकिलांची परवानगी मिळाली तरीही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता कमीच आहे. 06:00 AM: श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत कधी येणार याचीच तिचे नातेवाईक वाट पाहत आहेत. सकाळपासून अनेकांनी त्यांच्या मुंबईतील घरी हजेरी लावली आहे. श्रीदेवीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी येत आहेत. काल रात्री शाहरुख खानही तिथं आला होता. संबंधित बातम्या : श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी? गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं! श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर 'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये... श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार 'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?