मुंबई : जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत, याने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्यानंतर त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं नाव सातत्यानं चर्चेत येत राहिलं. अर्थात त्यामागे अनेक कारणं होती. रियाचं नाव यामुळं वादाच्या भोवऱ्यातही अडकलं. पण, अखेर ती या सर्व प्रकरणातून बाहेर पडली आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. 


सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता जवळपास, एक वर्ष पूर्ण व्हायला आलं असतानाच रियानं केलेल्या सोशल मीडिया पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिनं मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 


'मोठ्यातली मोठी दु:ख ताकद देऊन जातात, तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, तिथं थांबावं लागेल....', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. रियाने लिहिलेली ही पोस्ट वाचून चाहत्यांसोबतच अनेक फॉलोअर्सनीही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. 


 






Reunion Pic Of The Day : 'जब मिल बैठेंगे सब यार...', जगभरात चर्चा रियुनियनची 


14 जून 2020 ला सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या 
14 जून 2020 ला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. ज्यानंतर त्याचे वडील, के के सिंह यांनी रियाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अनेक गंभीर आरोप करत त्यांनी रियाविरोधात तक्रार केल्याचं त्यावेळी पायाला मिळालं होतं. ज्यानंतर सीबीआय, एनसीबी आणि ईडीकडून रियाच्या चौकशीचे फेरे लावण्यात आले. 


रियाला कारावासाची शिक्षा 
रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांची अनेकदा चौकशी केल्यानंतर रियाला अंमली पदार्थांची खरेदी केल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका होण्यापूर्वी साधारण महिन्याभरासाठी तिला कारावासाची शिक्षा झाली होती. सुशांतच्या निधनानंतर रियानं सोशल मीडियापासून दुरावा पत्करला होता. पण, त्यानंतर मात्र ती या वर्तुळात पुन्हा रमताना दिसली.