मुंबई : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीसोबत काम केलेली अलिसा खान सध्या दिल्लीच्या रस्त्यावर गुजराण करत आहे. ती मंदिरात झोपत आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत.


 

अनेक व्हिडीओ आणि बॉलिवूड चित्रपट 'माय हसबण्ड वाईफ'मध्ये भूमिका साकारलेल्या अलिसाला कुटुंबीयांनी घराबाहेर काढलं आहे. इम्रानसोबतचा 'आईना' हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

 

बॉयफ्रेण्डकडून MMS लीक

अलिसाच्या एक्स बॉयफ्रेण्डने 18 मार्च रोजी या दोघांचा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसंच फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याच्या मोबदल्यात त्याने अलिसाकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. पण अलिसाने पैसे न दिल्याने त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

 

तक्रारीनंतर व्हिडीओ हटवला, पण कुटुंबीयांनी अलिसा बाहेर काढलं

यानंतर अलिसा खानने मुंबई पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर सेलने  काही साईट्सवरुन व्हिडीओ हटवले. परंतु घराण्याच्या बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी अलिसाला घराबाहेर काढलं.

 

अलिसाच्या मते, तिच्या आई आणि भावाला तिचं तक्रार दाखल करणं आवडलं नाही आणि तिला घराबाहेर काढलं. घरातून हाकलल्यानंतर अलिसा आता मंदिरात, रस्त्यावर तसंच मित्र-मैत्रिणींच्या घरात आश्रय घेत आहे.

 

 

कोण आहे अलिसा खान?

- मूळची गाझियाबादची असलेली अलिसाने मुंबईत येऊन मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली.

 

- 'माय हसबण्ड वाईफ' सिनेमात तिने ऋषी कपूर आणि शक्ति कपूरसोबत काम केलं होतं.

 

- 2014 मध्ये दिग्दर्शक केसी बोकाडियाच्या 'डर्टी डान्सर' सिनेमात अलिसा होती.

 

- जिमी शेरगीलच्या 'राँग नंबर'मध्येही तिने काम केलं होतं.

 

- याशिवाय इम्रान हाश्मीसोबत तिच्या 'आईना' शूटिंग पूर्ण झालं आहे. हा सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

- अलिसा गाझियाबादच्या वजीर गाजी-उद्दीनच्या घराण्यातील आहे. अलिसाच्या पणजोबा वजीर गाजी-उद्दीन यांनी गाजियाबाद शहर वसवल्याचं म्हटलं जातं.