नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या अचानक एक्झिटनंतर त्याचे फॅन्स सतत सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित पोस्ट करत असतात. ज्या सतत व्हायरलही होतात. सुशांतला शेवटी छिछोरे या चित्रपटातून पाहण्यात आलं होतं. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. परंतु, कोरोनामुळे हा चित्रपट डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. अशातच सुशांतच्या या चित्रपटाचं टायटल ट्रॅक यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' 24 जुलै 2020 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर यूट्यूबवर रिलीज केल्यानंतर या ट्रेलरने फक्त बॉलिवूडच्याच नाहीतर 'एवेंजर्स एन्डगेम'सारख्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलरचाही रेकॉर्ड मोडीत काढला. सुशांतच्या चित्रपटाच्या टीझरने भारतात सर्वात कमी वेळात सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेल्या ट्रेलरचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. तसेच 17 तासांपूर्वी रिलीज
करण्यात आलेल्या 'दिल बेचारा' या टायटल ट्रॅक आतापर्यंत 16 मिलियन वेळा पाहण्यात आलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे
सुशांतच्या हे गाणं 'सोनी म्युजिक इंडिया'ने आपल्या ऑफिशिअल यूट्यूब अकाउंटवरून शेअर केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत 3.3 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. चित्रपट 'दिल बेचारा'च्या गाण्यावर त्यांचे फॅन्स कमेंट करत सुशांतच्या परफॉर्मंन्सचं कौतुक करत आहेत. बॉलिवूड दिग्गज ए. आर. रहेमान या गण्यावर कमेंट करत प्रोत्साहन दिलं आहे.
सध्या 'दिल बेचारा'चं टायटल ट्रॅक यूट्यूबवर नंबर एकवर ट्रेंड करत आहे. तसेच 4 दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटाचा टीझर बातमी लिहिपर्यंत नंबर दोनवर ट्रेंड करत होता. आतापर्यंत हा ट्रेलर 64 मिलियन लोकांनी पाहिला आहे.
पाहा ट्रेलर :
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे. सुशांतला शेवटी चित्रपट छिछोरे मध्ये पाहण्यात आलं होतं. तर सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचेरा' 24 जुलै 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल
Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास