kangana Ranaut : भाजप नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ बोलणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अकबर अल बकर वासुदेव नावाच्या व्यक्तीची खिल्ली उडवत आहेत. या प्रकरणावर कंगनाने कतार एअरवेजच्या सीईओविरोधात एक लांबलचक पोस्ट लिहित त्यांची खिल्ली उडवली. परंतु, कंगनाने नंतर ही इन्स्टाग्राम पोस्ट काढून टाकली.
अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बकर हे वासुदेव नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याला गरीब म्हणत आहेत."वासुदेव आमच्या एअरलाइन्समध्ये फक्त 624.50 रुपयांचा शेअरहोल्डर आहे. त्यामुळे आम्ही सर्व उड्डाणे बंद करून थांबवली आहेत."
सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. त्यामुळे कंगनाने देखील लगेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक मोठी पोस्ट लिहून अकबर अल बकर यांच्यावर एका गरीब 'भारतीय'ची चेष्टा केल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली. " जे या व्हिडीओला लाईक करत आहेत, ते भारतासारख्या देशाला एक ओझे आहेत, असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
कतार एअरवेजच्या सीईओचा हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे कंगना राणौतला समजल्यानंतर लगेचच कंगनाने तिची इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अपलोड केली होती.
भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कतारमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत वासुदेव नावाच्या व्यक्तीने व्हिडीओद्वारे कतारच्या वस्तू आणि विमान कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या