Upcoming Bollywood Movies : महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. अशातच मोठे बजेट असणाऱ्या सिनेमांनी त्यांच्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखांची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. पण आता सिनेमागृहे पुन्हा सुरू होत असल्याने सिनेप्रेमी खूश आहेत. सिनेमागृहे सुरू होणार म्हणून सिनेसृष्टीतही आनंदी आनंद आहे. संजय लीला भन्साळीसह, रोहित शेट्टीसारख्या अनेक निर्मात्यांनी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 


महाराष्ट्रात सिनेमागृहे सुरू होत असल्याने अनेक बिग बजेट सिनेमांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख  जाहीर केली आहे. या यादीमध्ये अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी', कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' आणि शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाचा समावेश आहे. रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला अक्षय कुमार आणि कॅटरीना कॅफचा 'सूर्यवंशी' सिनेमा 22 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 


रणवीर सिंगचा '83' सिनेमा नाताळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कबीर खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे कथानक भारतीय क्रिकेट टीमवर आधारित आहे. यश आणि संजय दत्तचा 'केजीएफ 2' सिनेमा 14 एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगनचा 'मैदान' सिनेमा 3 जूनला प्रदर्शित होणार आहे. तर अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानीचा 'एक विलन रिटर्न्स' ईदच्या दिवशी म्हणजेच 8 जुलै 2022 ला प्रदर्शित होणार आहे. 


जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित


जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे. 


लवरकच मोठ्या पडद्यावर दिसणारे कलाकार


आयुष्मान खुराना आणि वाणी कपूरचा 'चंडीगढ करे आशिकी' हा सिनेमा 10 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगनचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट 6 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा 'पृथ्वीराज' सिनेमा 21 जानेवारी 2022 ला प्रदर्शित होणार आहे. आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा' व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' 4 मार्च 2022 ला प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा 'हीरोपंती 2' 29 एप्रिल 2022 ला प्रदर्शित होणार आहे. आनंद एल राय यांनीदिग्दर्शित केलेला 'रक्षाबंधन' सिनेमा 11 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होणार आहे.