Blockbuster Films : विकेंडला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. पावसाना सुरू झाल्याने प्रेक्षक घरबसल्या सिनेमे पाहायला पसंती दर्शवत आहेत. पण या विकेंडला प्रेक्षकांना घरबसल्या ब्लॉकबस्टर सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या सिनेमासह 'जॉन विक 3' पर्यंत अनेक सिनेमे प्रेक्षक पाहू शकतात.
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस (Doctor Strange In The Multiverse Of Madness)
कुठे पाहायला मिळेल : डिज्नी प्लस हॉटस्टार
https://www.instagram.com/p/CfHJ-XaM9kS/
मार्वल स्टुडिओचा बहुचर्चित 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा (Doctor Strange In The Multiverse of Madness) दुसरा भाग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आता हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
द मैट्रिक्स रेसरेक्शन्स (The Matrix Resurrection)
कुठे पाहायला मिळेल : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
https://www.instagram.com/p/CXMHA1AIhqx/
वेगळं कथानक असलेला नाविन्यपूर्ण असा 'द मैट्रिक्स रेसरेक्शन्स' हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. थॉमस एंडरसनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात रीव्सकेसह प्रियंका चोप्रादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
1917
कुठे पाहायला मिळेल : सोनी लिव्ह
https://www.instagram.com/p/B6OKxcUHnpv/
1917 हा अनेक पुरस्कारांनी गौरवलेला सिनेमा आहे. उत्तम कथानक, वेगळा विषय आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. सॅम मेंडेसने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमाचे कथानक साहसी असून एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमाने केला आहे.
जॉन विक 3
कुठे पाहायला मिळेल : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
https://www.instagram.com/p/BxaJZQNhXJn/
'जॉन विक 3' या सिनेमाचे दिग्दर्शन चाड स्टेल्स्की यांनी केलं आहे. अकादमी पुरस्कार विजेता हाले बेरी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. मागील दोन भागांप्रमाणे जॉन विकचा तिसरा भागदेखील भितीदायक आहे.
एक्स्ट्रॅक्शन (Extraction)
कुठे पाहायला मिळेल : नेटफ्लिक्स
https://www.instagram.com/p/B_-LQaCpJnt/
सॅम हारग्रेव दिग्दर्शित 'एक्स्ट्रॅक्शन' या सिनेमाचे कथानक रूसो ब्रदर्स आणि अॅंटनी पार्कने लिहिलेले आहे. सिनेमाचे भावनिक कथानक प्रेक्षकांना भावत आहे. रुद्राक्षच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. तर या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. आता हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
विकेंड जाणार आनंदात
एयरटेल एक्सस्ट्रीम फायबरच्या नव्या ऑल-इन-वन एंटरटेनमेंट प्लॅनमध्ये यूजरला वाय-फाय, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनल फक्त 699 रुपयांत उपलब्ध होणार आहेत. तसेच अॅमेझॉन प्राइमसह 16 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म यात डिज्नी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा सहभाग आहे. 350 हून अधिक टीव्ही चॅनलदेखील प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा विकेंड आनंदात जाणार आहे.
संबंधित बातम्या