बिपाशाने या जीन्सचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करुन आपला संताप व्यक्त केला. “फॅशनच्या नावावर... आम्हाला जीन्स अतिशय प्रिय आहेत. कृपया याच्यासोबत हे सर्व करु नका... हे अतिशय दुर्दैवी आहे... नेकेड जीन्स मला आवडली नाही...”
सोशल मीडियावर या जीन्सला नेकेड जीन्स असं नाव दिलं आहे. केवळ कापडाचे दोन तुकड्याप्रमाणे दिसणाऱ्या या जीन्सवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
जीन्सचा हा नवा प्रकार थिबॉट 2018 च्या समर कलेक्शनमधील एक भाग आहे.
अभिनेते ऋषी कपूर यांनीही जीन्सच्या या नव्या प्रकाराची टर उडवली आहे.