व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने म्हटलं आहे की, “जो MMS माझा आहे असं सांगून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या व्हिडीओमधील खरी मुलगी ही आहे”
शिल्पाच्या या पोस्टनंतर तिला ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे. बिग बॉस 11 मध्ये तिची प्रमुख प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकीने शिल्पावर हल्ला चढवला आहे. हिना आणि रॉकीने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
बिग बॉस 11 मध्ये शिल्पा आणि तिचा सहकारी स्पर्धक विकास गुप्ता यांच्यातील ‘रिलेशन’ खूपच गाजले होते. त्यावेळी शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ चर्चेत होता. या व्हिडीओत शिल्पा आणि विकास गुप्ता यांच्यातील ‘इंटिमेंट सीन’ दिसत होते.
मात्र शिल्पा शिंदेने तो व्हिडीओ पुन्हा काढून, खरा व्हिडीओ आपल्या हाती लागल्याचं म्हटलं आहे.
व्हिडीओ शेअर
गेल्या काही दिवसांपासून एक MMS व्हायरल होत होता, ज्यामध्ये दिसणारी महिला शिल्पा शिंदे असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता शिल्पाने तोच MMS आपल्या ट्विटरवरुन शेअर करत, आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला.
मात्र नेटकऱ्यांनी शिल्पा शिंदेलाच फटकारलं आहे.
ट्विटमध्ये शिल्पाने काय म्हटलंय?
“कृपया हा व्हिडीओ पाहा. ज्यांना काही काम धंदा नाही, ते दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. हा त्या खऱ्या मुलीचा व्हिडीओ आहे, जो शिल्पा शिंदेच्या नावावर खपवला जात आहे”, असं शिल्पाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हिना आणि रॉकीचा शिल्पावर निशाणा
शिल्पाच्या या ट्विटनंतर तिची शत्रू समजली जाणारी प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंडने आक्रमक पवित्रा घेतला.
सर्वात आधी रॉकी जयस्वालने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला. त्यानंतर हिना खाननेही रॉकीचं म्हणणं खरं असल्याचं म्हणतं, ट्विट केलं.
“ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. कोणाचेही फॅन्स सोशल मीडियावर काहीही पोस्ट करुन दूर होऊ शकतात. मात्र जे सेलिब्रिटी, सार्वजनिक चेहरे असतात, ते एका ट्विटद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपल्याला जबाबदारी आणि सावधानता बाळगणं आवश्यक आहे. विशेषत: या दिवसात, जेव्हा रियल लाईफ कोणताही रियालिटी शो नसतो”
रॉकीचं ट्विट
रॉकीने ट्विट केलं की, “शिल्पा, तुझ्याबद्दल जे काही झालं ते दुर्दैवी आहे. तुला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र मला तुला एक विचारायचं आहे की, तू जो व्हिडीओ शेअर केला आहेस, तो संबंधित महिलेचा असल्याचा पुरावा तुझ्याकडे आहे का? तू याबाबत दावा करु शकतेस का? एक जबाबदार सेलिब्रिटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्न प्रमोट करण्याऐवजी कायद्याचा आधार घेता आला असता की नाही?”
संबंधित बातम्या
बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेनं लग्नाविषयी मौन सोडलं!
व्हायरल सत्य : शिल्पा शिंदे विकास गुप्तासोबत लग्न करणार?
BIG BOSS 11 : शिल्पा शिंदे विजेती, हीना खानवर मात