Supertstar Arrested in Hit And Run Case : मल्याळम चित्रपटससृष्टीतील (Malayalam Film Industry) प्रसिद्ध अभिनेता श्रीनाथ भासी (Sreenath Bhasi) याला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Case) अटक केली होती. मात्र, मंगळवारी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. हे प्रकरण ड्रग पार्टीशी संबंधित आहे. पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीनाथ भासी यांची कार रस्ता अपघातात दुचाकीला धडकली. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर त्यांनी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.                         


हिट अँड रन प्रकरणात पीडितेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.                


ड्रग पार्टीचं कनेक्शन नेमकं काय?                


श्रीनाथ भासीच्या अटकेचं प्रकरण एका ड्रग पार्टीच्या तपासाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या सहभागावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


श्रीनाथ भासीनं मल्याळम सिनेसृष्टी गाजवलीय


श्रीनाथ भासीचा जन्म 29 मे 1988 रोजी झाला. तो मल्याळम चित्रपट अभिनेता, गायक आणि रेडिओ जॉकी आहे. रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचबरोबर तो व्हिडीओ जॉकीही होता. दा थडिया (Da Thadiya) या चित्रपटामुळे श्रीनाथला खरी ओळख मिळाली. तो आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.


लॉन्ग टाईम गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ 


श्रीनाथ भासीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रीनाथनं 9 डिसेंबर 2016 रोजी कोची येथे त्याची दीर्घकाळची मैत्रीण रीथू जकारियाशी (Reethu Zachariah) लग्न केलं.


यापूर्वीही केलेली अटक 


केरळ पोलिसांनी 23 सप्टेंबर 2022 रोजी यूट्यूब चॅनल अँकरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेता श्रीनाथ भासी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता . त्याच दिवशी रेड एफएमच्या थेट मुलाखतीदरम्यान भासी यानं एका मल्याळम रेडिओ पत्रकाराला शिवीगाळ केली . 26 सप्टेंबर 2022 रोजी, शाब्दिक गैरवर्तन प्रकरणात श्रीनाथ भासी यांना चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vivek Oberoi Viral Video : विवेक ओबेरॉयची बिश्नोई समाजावर स्तुतीसुमनं; सिद्दिकींच्या हत्येनंतर 'तो' VIDEO Viral, नेटकरी म्हणाले, "सलमान खान का सबसे बडा दुश्मन"