Ajay Devgn Blolaa Teaser Out : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) बोलबाला आहे. एकीकडे अक्षयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. दुसरीकडे त्याच्या आगामी 'भोला' (Bholaa) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरचे वैशिष्ट्य म्हणजे हा टीझर खास 3 डीमध्ये रिलीज करण्यात आला आहे. 


'भोला' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'भोला' हा सिनेमा ज्योती नामक एका लहान मुलीवर बेतलेला आहे याचा टीझरवरुन अंदाज येतो. टीझरमध्ये अजय देवगण तुरुंगात बसून गीता वाचताना दिसत आहे.






'भोला' हा रहस्यमय सिनेमा असून या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे. अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता अजयला पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत!


अजयच्या 'भोला'चा टीझर आऊट झाल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 'भोला' हा दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा हिंदी रिमेक आहे. तसेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगण सांभाळत आहे. 


'भोला' या सिनेमात अजय बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबत दिसणार आहे. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी अजय आणि तब्बूची जोडी 'दे दे प्यार दे' या सिनेमात दिसून आली होती. तर अजय देवगण, टी-सीरिज फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि ड्रीम वॉरिअर पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.


अजयने भोला सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"कोण आहे तो...ज्याला स्वत:लाच माहित नाही तो हरवला आहे". या टीझरवर अजय देवगण पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये, 'भोला' ब्लॉकबस्टर होणार अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर 'भोला'चा टीझर व्हायरल होत आहे. 


संबंधित बातम्या


Bholaa : अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा बनवणार हिंदी रिमेक