Bheed Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा भीड (Bheed) हा चित्रपट काल (24 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. भीड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. हा चित्रपट ब्लॅक अॅन्ड व्हाईट थीमवर आधारित आहे. भीड या चित्रपटाचं क्रिटिक्सनं कौतुक केलं. सोशल मीडियावर देखील अनेकांनी या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पण तरी देखील हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. जाणून घेऊयात भीड चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन...
भीड चित्रपटाचं ओपनिंग-डेचं कलेक्शन
कोरोनाकाळात अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊन दरम्यान अनेक जण आर्थिक अडचणींचा समाना करत होते. हे सर्व भीड या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलं आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
भीडची स्टार कास्ट
भीड या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्यासोबतच कज कपूर, आशुतोष राणा, दिया मिर्झा, संजय मिश्रा, कृतिका कामरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटानं ओपनिंग-डेला तर चांगली कमाई केली नाही? आता या चित्रपटाचा समावेश हिट की फ्लॉप चित्रपटांचा यादीत होते, जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
भूमी आणि राजकुमार यांचे चित्रपट
भीड या चित्रपटासोबत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांनी बधाई दो या चित्रपटात देखील काम केलं आहे. हर्षवर्धन कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटातील भूमी आणि राजकुमार यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भूमी आणि राजकुमार यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
महत्वाच्या इतर बातम्या:
Rajkummar Rao: 'तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस का?' ट्रोलर्सच्या प्रश्नाला राजकुमार रावनं दिलं उत्तर