Best Marathi Movies : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीचे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहेत. मी वसंतराव (Me Vasantrao), गोदावरी (Godavari), कच्चा लिंबू (Kaccha Limbu), मुरांबा असे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
1. मी वसंतराव (Me Vasantrao)
संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'मी वसंतराव' (Me Vasantrao) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात राहुल देशपांडे, अनिता दाते मुख्य भूमिकेत होते. अनेक पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे.
2. गोदावरी (Godavari)
निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' (Godavari) हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी आणि विक्रम गोखले या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. प्राजक्त देशमुखने या सिनेमाचं कथानक लिहिलेलं आहे.
3. कच्चा लिंबू (Kaccha Limbu) :
प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' (Kaccha Limbu) हा सिनेमा 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका जोडप्याची आणि त्यांच्या मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. रवी जाधव, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.
4. नदी वाहते (Nadi Vahate) :
गेल्या काही दिवसांपूर्वी 'नदी वाहते' (Nadi Vahate) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. संदीप सावंत दिग्दर्शित हा सिनेमा अनेक पुरस्कार सोहळ्यांत चांगलाच गाजला. या सिनेमात आशा शेलार, अभिषेक आनंद, पूनमशेट गावकर, जयंत गाडेकर, गजानन झर्मेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
5. व्हेंटिलेटर (Ventilator) :
राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' (Ventilator) या सिनेमात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुलभा आर्य आणि सुकन्या मोनेसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. कामरकर कुटुंबाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 25 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
संबंधित बातम्या