Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानचा (Ira Khan) नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेकीच्या साखरपुड्यात परफेक्शनिस्ट खूप आनंदी दिसून आला. त्याचा डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लेकीच्या साखरपुड्यात आमिर खान पांढऱ्या कुर्त्यामध्ये हटके स्टाईलमध्ये दिसला. आमिरचा लूक पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. हा आमिर खान आहे? हा तर म्हातारा दिसत आहे, आमिरचा खरा चेहरा समोर आला, अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.
आमिरची लेक आयरा आणि नुपूर शिखरेचा नुकताच मुंबईत साखरपुडा पार पडला. संपूर्ण खान कुटुंबीय आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थित त्यांचा साखरपुडा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केलं आहे.
आमिरचा लूक चर्चेत!
आयरा आणि नुपूर शिखरेच्या साखरपुड्यादरम्यान आमिरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधलं. पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि पांढऱ्या रंगाची दाढी असा काहीसा आमिरचा लूक होता. तसेच त्याने काळ्या रंगाचा गॉगलही घातला होता. त्यामुळे त्यांच्या हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले होते.
कोण आहे नुपूर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नुपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चाहत्यांमध्ये चर्चा होऊ लागली.
संंबंधित बातम्या