Bedhadak : करण जोहरचा आगामी 'बेधडक' (Bedhadak) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शनाया कपूर (Shanaya Kapoor) मुख्य भूमिकेत असणार आहे. शनाया कपूर ही संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी आहे. शनाया सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. 


'बेधडक' सिनेमाच्या माध्यमातून शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शनायासह लक्ष्य आणि गुरफताहदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतानं यांनी केले आहे. शनायाशिवाय या
सिनेमात लक्ष्य ललवानी आणि गुरफतेह पिरजादादेखील मुख्य भूमिकेत आहेत.





करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बेधडक' सिनेमाची घोषणा केली आहे. यासोबतच सिनेमातील तीन नवीन कलाकारांचे फर्स्ट लूक पोस्टर्सही शेअर करण्यात आले आहेत. शनाया कपूरचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Attack Poster : जॉन अब्राहमचा 'अटॅक' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवे पोस्टर प्रदर्शित


Rula Deti Hai Song Released : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे 'रुला देती है' गाणे रिलीज


Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha