Bear Grylls: मॅन व्हर्सेस वाइल्ड या बेअर ग्रील्सच्या (Bear Grylls) कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जंगलामध्ये अडकल्यानंतर  कोणत्याही यंत्राचा वापर न करता  बाहेर  कसं पडायचं हे बेअर ग्रील्सनं त्याच्या कार्यक्रमातून अनेकांना शिकवलं. आता रनिंग  वाइल्ड विथ बेअर ग्रील्स (Running Wild With Bear Grylls) या बेअर ग्रील्सच्या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बेअर ग्रील्सनं नुकताच त्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बेअर ग्रील्सनं लुंगी परिधान केली आहे, असं दिसत आहे. हा फोटो शेअर करुन  बेअर ग्रील्सनं त्याच्या  रनिंग वाइल्ड विथ बेअर ग्रील्स या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये कोण हजेरी लावणार आहे? याची हिंट दिली आहे. 

Continues below advertisement


 बेअर ग्रील्सनं त्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, बेअर ग्रील्सनं  लुंगी परिधान केली आहे. या फोटोला त्यानी कॅप्शन दिलं, 'रनिंग वाइल्ड विथ बीजी, स्कॉटिश अ‍ॅडव्हेंचरचा हा स्नॅपशॉट आहे. रनिंग वाइल्ड विथ बीजी  Disney Plus  आणि Nat Geo TV वर  लवकरच येत आहे! या कार्यक्रमामध्ये कोणता पाहुणा येणार आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता?' या ट्वीटमध्ये बेअर ग्रील्सनं येणाऱ्या पाहुण्याबद्दल 'लांब केस, ब्रिटिश आणि खरा आयकॉन' अशा हिंट्स दिल्या आहे. 






रिपोर्ट्सनुसार, रनिंग वाइल्ड विथ बेयर ग्रील्स या रिअॅलिटी शोमध्ये सामील होण्यासाठी  अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्याशी देखील कार्यक्रमाच्या टीमनं चर्चा केली  आहे. आता रनिंग वाइल्ड विथ बेयर ग्रील्स या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये कोणता सेलिब्रिटी सामील होईल? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमार यांनी रनिंग वाइल्ड विथ बेयर ग्रील्स या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. तसेच विकी कौशल आणि रणवीर सिंहनं देखील बेयर ग्रील्सच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ranveer vs Wild: दीपिकासाठी फुल आणायला निघालेल्या रणवीरला अश्रू झाले अनावर; बेयर ग्रील्सनं दिलं प्रोत्साहन