मुंबई : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत असताना बॉलिवूडमधील कलाकारांनाही कोरोनाची लागण होणे सुरूच आहे. बॉलिवूडचे संगितकार आणि गायक बप्पी लहिरी यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बप्पी लहिरी यांची मुलगी रीमा लहिरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. बप्पी लहिरी यांची तब्बेत आता स्थिर असून काळजी करण्यासारखं काही नाही असंही रीमा यांनी सांगितलं.
बप्पी लहिरी यांनी 17 मार्चला सोशल मीडियावर सांगितलं होतं की त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लसीची प्रक्रिया सुलभ असल्याचं सांगत त्यांनी देशातील प्रत्येकाने कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन केलं होतं.
त्यांच्या मुलगी रीमा म्हणाल्या की, "बप्पी दा नी कोरोनाबद्दल प्रचंड सतर्कता बाळगली होती, त्यांनी कोरोनाची लसही घेतली आहे. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कमी लक्षणं असल्यानं काळजीचं कारण नाही. बप्पी दा यांच्या आरोग्याबद्दल प्रार्थना करणाऱ्यांचे मी आभार मानते."
68 वर्षीय बप्पी दा यांनी 2014 साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.
या आधी रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आलिया भट्टच्या (Aliya Bhatt) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आलिया भट्टला कोरोना
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण झाली असून तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केले की, "माझी कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे आणि आणि सर्व नियमांचं पालन करत आहेत. तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद"
महत्वाच्या बातम्या :