मुंबई : सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. बप्पी लहिरी यांना कोरोना संसर्गामुळे गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बप्पी लहिरी यांनी काळजी घेतल्याबद्दल डॉक्टर्स आणि ब्रीच कँडी रुग्णालयाच्या सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शुभेच्छा पाठवणाऱ्या सर्वांचे बप्पी दा यांनी आभार मानले.


गेल्या आठवड्यात बप्पी दा यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांची मुलगी रीमा लहिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार “बप्पी दा यांनी कोरोनाबद्दल प्रचंड सतर्कता बाळगली होती, त्यांनी कोरोनाची लसही घेतली आहे. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती. 68 वर्षीय बप्पी दा यांनी 2014 साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.


अनेक कलाकारांना कोरोना
देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत, अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. अलीकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.