मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाचा टीझर आज लॉन्च होणार आहे. 'सरकार' सिनेमात बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावरुन प्रेरणा घेत भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट लॉन्च करणार आहेत. हा चित्रपट हिंदी भाषेत बनणार आहे.


या चित्रपटात आता नवाझुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिका साकारणार आहे. नवाझुद्दीनच्या आधी या व्यक्तीरेखेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खानच्या नावावर विचार केला होता." 'ठाकरे' असं या बायोपिकचं नाव आहे.

स्मिता ठाकरे यांनीही 2015 मध्ये बाळासाहेबांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. त्यांचा मुलगा आणि बाळासाहेबांचे नातू राहुल ठाकरे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या विरोधानंतर हा चित्रपट बनला नाही. आता राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.

संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांनी मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा," असं मला वाटतं.