Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आठवडा झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाचा बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या आठ दिवसांनंतरही अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहे. 


माउथ पब्लिसिटीच्या जोरावर 'बाईपण भारी देवा' सुपरहिट!


'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आऊट झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता होती. एकीकडे या सिनेमाचं प्रमोशन होत असताना दुसरीकडे मात्र माउथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम केलं आहे. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहेत. 


'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... ( Baipan Bhaari Deva Box Office Collection Day 8)


'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, ओपनिंग डेला 1.3 कोटींच्या कमाई केलेल्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने आतापर्यंत 15.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. 




  • पहिला दिवस : 1.3 कोटी




  • दुसरा दिवस : 2.45 कोटी




  • तिसरा दिवस : 3.3 कोटी




  • चौथा दिवस : 1.2 कोटी




  • पाचवा दिवस : 1.5 कोटी




  • सहावा दिवस : 1.85 कोटी




  • सातवा दिवस : 1.61 कोटी




  • आठवा दिवस : 2 कोटी




  • एकूण कमाई : 15.20 कोटी




'बाईपण भारी देवा' या सिनेमातील गाणी, संवाद, कलाकारांचा अभिनय, मांडणी दिग्दर्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रेक्षकांसह चाहतेदेखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या सिनेमाबद्दल भाष्य करत आहेत. या सिनेमातील 'मंगळागौर' गाणं सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. 'आयएमडीबी'च्या (IMDB) रेटिंगमध्ये या सिनेमाने कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणीच्या (Kiara Advani) 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या सिनेमालाही मागे टाकलं आहे. आयएमडीबीमध्ये 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला 8.8 रेटिंग मिळाले आहे. तर 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाला 7.4 रेटिंग मिळाले आहे. 
 
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला