Baipan Bhaari Deva Box Office Collection In USA : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा आहे. भारतीय बॉक्स ऑफिससह जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालतो आहे. आता अमेरिकेतही (USA) या सिनेमाने इतिहास रचला आहे.


'बाईपण भारी देवा'ने रचला इतिहास


'बाईपण भारी देवा' या सिनेमाने भारतासह अमेरिकेतही इतिहास रचला आहे. आतापर्यंत अमेरिकेत (USA) या सिनेमाने 100 हजार डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनानुसार या सिनेमाने 82 लाख 17 हजार 500 रुपयांची कमाई केली आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हे चित्र खूपच सुखद आहे. 


अमेरिकेतही मराठी सिनेमा पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. चांगलं कथानक, सर्वोत्कृष्ट कलाकार, उत्तम सादरीकरण आणि उत्कृष्ट मांडणी असेल तर प्रेक्षक तो सिनेमा पाहतो हे 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने दाखवून दिलं आहे. महिलांचे वेगवेगळे ग्रुप पुन्हा पुन्हा 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहत आहेत. 






'बाईपण भारी देवा'ने पार केला 50 कोटींचा टप्पा (Baipan Bhaari Deva Box Office Collection) 


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई करत सर्वांना थक्क केलं. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 12.4 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 24.95 कोटींचं कलेक्शन केलं आहे. एकंदरीत रिलीजच्या अठरा दिवसांत या सिनेमाने 53.33 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'बाईपण भारी देवा'ची दणदणीत कमाई पाहता लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल, असे म्हटले जात आहे. 


तगडी स्टार कास्ट असलेल्या 'बाईपण भारी देवा'चा सर्वत्र बोलबाला (Baipan Bhaari Deva Starcast)


केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. या सहा अभिनेत्रींनी आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  


जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या बहिणींची गोष्ट महिलावर्गाला भावत आहे. अभिनेत्रींच्या अभिनयासह त्यांच्या हटके पेहरावाचंही कौतुक होत आहे. अनेक महिला खास गॉगल लावून आणि नऊवारी साडी नेसून सिनेमा पाहायला जात आहेत. सिनेमातील गाणंदेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे.


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची हवा; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय?