मुंबई : कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या, बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अनेक प्रेक्षक ‘बाहुबली स्पॉयलर्स’ टाळण्यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट्स, ‘बाहुबली’ हा शब्दही दिसणारे मेसेज किंवा बातम्या, रिव्ह्यूज टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईत प्रेक्षक मॉर्निंग वॉक सोडून सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापुरातही प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

'बाहुबली : द बिगिनिंग' हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती.

बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.

दुबईत 'बाहुबली 2' प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

दुबईतील प्रेक्षकांना कटप्पाचं गुपित उलगडलं असून दुबईतील समीक्षकांनी चित्रपटाला 5 स्टार आणि स्टँडिंग ओव्हेशन दिलं आहे.

बाहुबली 2 म्हणजे ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’चा पहिला-वहिला रिव्ह्यू समोर आला आहे. उमैर साधू या यूके, यूएईमधील सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि समीक्षकाने सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. ट्विटरवर उमैरने दिलेल्या माहितीनुसार त्याने बाहुबली 2 ला पाच स्टार्स दिले आहेत.

हॉलिवूडमधील लेजेंडरी चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि हॅरी पॉटरशी उमैरने बाहुबली 2 ची तुलना केली आहे. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासवर त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय भल्लालदेव साकारणारा राणा डुग्गुबाती, रम्या कृष्णनने साकारलेली शिवगामी या व्यक्तिरेखाही मनावर छाप पाडून जात असल्याचं त्याने सांगितलं आहे.

बाहुबली 2 मधील उत्तुंग सेट्स, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर, ध्वनी, संकलन, छायाचित्रण यासारख्या तांत्रिक बाबींवरही उमैरने स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचप्रमाणे कथा, पटकथा, संवाद, संगीतही अत्युच्च दर्जाचं असल्याचं त्याने सांगितलं आहे. या चित्रपटाची भविष्यात क्लासिक्समध्ये गणना होईल, असा विश्वासही उमैरने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!


‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक


पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ


कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…


‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट


रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर


VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज