महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर 'बाहुबली 2' चं नवं पोस्टर
एबीपी माझा वेब टीम | 24 Feb 2017 02:40 PM (IST)
मुंबई : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मच अवेटेड सिनेमा 'बाहुबली 2' या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे. अभिनेता प्रभास म्हणजेच बाहुबली हत्तीच्या सोंडेवर आरुढ झालेला या पोस्टरमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं याआधीही एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यावेळी रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत लाखो चाहत्यांनी हे पोस्टर शेअर केलं आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्या बाहुबली या सिनेमाचा 'बाहुबली : दी कन्क्लुजन' हा सिक्वेल सिनेमा आहे. यावर्षी 28 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. संबंधित बातम्या :