बाहुबलीमध्ये शिवगामीने वाचवलेलं 'ते' बाळ कोण?
‘बाहुबली 2’ चा 10 दिवसात भारतासह जगभरातील कमाईचा आकडा 1000 कोटींच्या पार गेला आहे. यामध्ये भारतात 800 कोटी रुपये तर भारताबाहेर 200 कोटी कमाई 'बाहुबली 2' नं केली आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईत बाहुबली 2 ने सलमानच्या सुलतानचा रेकॉर्ड मोडला होता. सुलतानने पहिल्या आठवड्यात 208.82 कोटींची कमाई केली होती.
'बाहुबली 2'साठी प्रभासने 10 कोटींची जाहिरात नाकारली!
दुसरीकडे, आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा विक्रमही मोडित निघाला आहे. दंगल चित्रपटानं आतापर्यंत एकूण 744 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर ऑल टाईम ग्रॉसिंगमध्ये नवा विक्रम रचला आहे. पहिल्या आठवड्यात ‘दंगल’ने 197.54 कोटी कमावले होते. चित्रपट क्षेत्रातील जाणकार रमेश बाला यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. तसंच धर्मा प्रॉडक्शननंही 1000 कोटींचा पल्ला पार केल्याचं ट्विट केलं आहे.
https://twitter.com/rameshlaus/status/861057493216227328
नवव्या दिवशी हिंदी बाहुबली 2 नं 26.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 10 दिवसांमध्ये हिंदीत एकूण 391 कोटींची कमाई बाहुबली 2 नं केली आहे.
https://twitter.com/rameshlaus/status/861102963053535232
आमीरच्या पीके-दंगलचा विक्रम मोडित
ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बाहुबली 2 नंबर वन आहे. बाहुबली (1000 कोटी), पीके (792 कोटी), दंगल (744 कोटी) अशी क्रमवारी आहे. त्यामुळे ऑल टाईम कमाईत मिस्टर परफेक्शनिस्टचं असलेलं वर्चस्व मोडित निघालं आहे. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावरही बाहुबली 1 आहे. या चित्रपटाने एकूण 650 कोटी कमवले होते.
शाहरुखचा विक्रम मोडण्यात मात्र प्रभास अपयशी
ओपनिंग डेच्या कमाईत मात्र हिंदी ‘बाहुबली 2’ शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या तुलनेत तोकडा पडला. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटी, तर बाहुबली 2 ने 41 कोटी कमवले होते.
मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन
बाहुबली 2 नं पहिल्याच दिवशी भारतात एकूण (सर्व भाषा मिळून) 121 कोटींची कमाई केली होती. यात हिंदीतील 41 कोटींशिवाय, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम यांच्या एकूण 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे. हिंदी भाषेत बाहुबली 2 ला दीडशे कोटींचा टप्पा पार करण्यास चार दिवस (28 एप्रिल ते 1 मे – एक्स्टेंडेड वीकेंड) लागले.
सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपये जमवले, तर दंगलने 29.78 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे साहजिकच हिंदीत आमीर-सलमानचे ओपनिंग डे चे रेकॉर्ड प्रभासकडून मोडित निघाले. मात्र ओपनिंग डेला हिंदी ‘बाहुबली 2’ शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या तुलनेत तोकडा पडला. ‘हॅपी न्यू इयर’ने पहिल्या दिवशी 45 कोटी, म्हणजेच बाहुबली 2 पेक्षा 4 कोटी जास्त कमवले होते.
ओपनिंग वीकेंड (एक्स्टेंडेड वीकेंड) ची बाहुबली 2 ची भारतातील कमाई :
पहिला दिवस – शुक्रवार 28 एप्रिल – 41 कोटी
दुसरा दिवस – शनिवार 29 एप्रिल – 40.5 कोटी
तिसरा दिवस– रविवार 30 एप्रिल- 46.5 कोटी
चौथा दिवस – सोमवार 1 मे – 40.25 कोटी
पाचवा दिवस - मंगळवार 2 मे - 30 कोटी
सहावा दिवस - बुधवार 3 मे - 26 कोटी
सातवा दिवस - गुरुवार 4 मे - 22.75 कोटी
आठवा दिवस - शुक्रवार 5 मे - 19.75 कोटी
‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.