मुंबई : प्रेक्षकांसह समीक्षकांच्या कौतुकाची पावती मिळालेल्या, राष्ट्रीय पुरस्कारांवर छाप पाडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तूफान घोडदौड सुरु आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचा नवा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफच्या 'बागी'ने तिकीटबारीवर कमाल दाखवली आहे. 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'बागी'ने तीन दिवसात तब्बल 38.58 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 

 

पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बागीने 11.94 कोटी, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 11.13 कोटी तर तिसऱ्या दिवशी (रविवारी) 15.51 कोटींची कमाई केली. एकूण दोन दिवसात तब्बल 38.58 कोटींचा गल्ला बागीने जमवला आहे.

 

 

'बागी'चा पहिल्या दोन दिवसांचा गल्ला टायगरच्या 'हिरोपंती'च्या एका आठवड्याच्या गल्ल्यापेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे बागी 2016 मधला तिसऱ्या क्रमांकाचा हायेस्ट ओपनिंग (पहिल्या दिवसाची सर्वाधिक कमाई) करणारा चित्रपट ठरला आहे.

 

 

https://twitter.com/taran_adarsh/status/726645603921338369

 

https://twitter.com/taran_adarsh/status/726645704672702465

 

 

बॉक्स ऑफिसवर सैराट सुसाट, दोन दिवसात बक्कळ गल्ला


 

 

परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात  7.35 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 
शब्बीर खान दिग्दर्शित टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा बागी चित्रपटही प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. भारतासह पाकिस्तान आणि आखाती देशात सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळालं आहे. 29 एप्रिल रोजी भारतात 2750 स्क्रीन्सवर आणि परदेशात 344 स्क्रीन्सवर झळकला होता.

 

 

https://twitter.com/taran_adarsh/status/726359143527882752
यापूर्वी शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटाने पहिल्या दिवशी 19.20 कोटी, तर अक्षयकुमारच्या 'एअरलिफ्ट'ने 12.35 कोटी कमवले होते. त्यानंतर बागी 11.94 कोटी कमवत 2016 मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.

 

 

https://twitter.com/taran_adarsh/status/726279983031787520